टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आम्ही 50 खोके नाही, तर दोनशे खोके… ; मुख्यमंत्री शिंदे

On: November 14, 2022 3:16 AM
Follow Us:
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल विविध विकासकामांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात होते. विविध रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज्याने खूप भोगले आहे. निर्बंधामुळे कोणतेच सण झाले नाहीत. मात्र आमचे सरकार आल्यानंतर सर्व निर्बंध उठवण्यात आले. नागरिकांनी सर्व सणांचा आनंद घेतला. इतकेच नव्हे तर गेल्या अडीच महिन्यात 72 मोठे व चांगले निर्णय घेतले.
त्यामुळेच विरोधक सैर भैर झाले आहेत. आमच्या सरकारवर नेहमी पन्नास खोक्यांचा आरोप केला जातो. आम्हाला यामुळे काहीच फरक पडत नाही. आम्ही 50 खोके नाही तर 200 खोके जनतेच्या हितासाठी देणार आहोत. टीका करणाऱ्यांना माहित आहे की मी घेणारा नाही तर देणारा आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. मला अजून काही बरंच बोलायचं आहे मात्र इतक्यात मी बोलणार नाही. वेळ आल्यावर हळूहळू याचा उलगडा करू, असा इशारा शिंदे यांनी दिला.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now