च्यवनप्राशला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. च्यवनप्राश बनवण्यासाठी आवळा व इतर 40 रसायनद्रव्ये, रक्तशुद्धीकर द्रव्ये व त्रिदोषशामक द्रव्ये वापरली जातात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात. च्यवनप्राश हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे.
च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरले जाणारे घटक उत्कृष्ट प्रतीचे असणे आवश्यक असते शिवाय ते बनवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करावा. च्यवनप्राशचा मुख्य घटक हा आवळा आहे. आवळा हे एक उत्तम प्रकारचे व सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक हे औषध आहे.
- आयुर्वेदामध्ये आवळ्याला वयःस्थापन द्रव्य मानले जाते. त्यामुळे वाढत्या वयामुळे शरीराची होणारी झीज कमी प्रमाणात व्हावी व तारुण्य टिकवण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे. भारतीय संस्कृतीमध्ये च्यवनप्राशला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. च्यवनप्राशचे सेवन केल्याने प्राणवह स्रोतसांचे (फुफ्फुसांचे) रोग दूर ठेवण्यास मदत होते. च्यवनप्राशसेवन केल्याने व्याधीक्षमत्व वाढते. रोज सेवन केलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यास मदत करते. ह्याच्या सेवनाने तारुण्य टिकवण्यासाठी मदत होते. बुद्धीवर्धक असल्याने लहान मुलांसाठी उपयुक्त आहे.
संबंधित बातम्या
स्टीलच्या भांड्यात चुकूनही हे 5 पदार्थ ठेवू नका, बनू शकतात विष
Horoscope Today 04 December 2025 : बिझनेस जोरात चालणार, नवी ऑफर मिळणार… आजचे राशीभविष्य
Digital 7/12 ला कायदेशीर मान्यता! चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुन्हा मास्टरस्ट्रोक, अवघ्या 15 रुपयांत डाऊनलोड करा, GR वाचला का?
हळद जास्त पोटात गेली तर किडनी आणि लिव्हर फेल ? सुरक्षित प्रमाण काय ?
निवडणुका होणारच, स्थगिती नाही…; महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठा निर्णय




