Saturday, September 21, 2024
Homemaharashtraहातात बांगड्या भरल्या नाहीत; जे करायचे आहे ते करणारच

हातात बांगड्या भरल्या नाहीत; जे करायचे आहे ते करणारच

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज शिवाजी महाराजांसंदर्भांत जे वक्तव्य केले, त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अशातच खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.
आम्ही गहिवरलो म्हणजेच आम्ही हतबल झालो नाही किंवा आम्ही हातात बांगड्या सुद्धा भरल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचे ते आम्ही ठरवू पण इतरांनीही त्याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत उदयनराजे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा मार्ग दाखविला. राज्यकारभारात जनतेचा सहभाग असावा, विविध जाती धर्मातील लोकांना न्याय मिळावा यासाठी शिवाजी महाराजांनी त्याकाळी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. शिवाजी महाराजांचा तोच विचार घेऊन देशभरातील विविध जाती धर्मातील लोक एकत्र आले आणि स्वराज्याची स्थापना झाली. त्यालाच आपण आता लोकशाही असे म्हणतो, असे उदयनराजे म्हणाले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments