Sunday, October 6, 2024
Homesolapurसोलापूरच्या बँकिंग क्षेत्रात विशेष भर

सोलापूरच्या बँकिंग क्षेत्रात विशेष भर

बँक ऑफ बडोदाच्या सोलापूर क्षेत्राच्या नूतन  कार्यालयाचं उद्घाटन जुळे सोलापूर येथे  मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यामुळं सोलापूरच्या बँकींग क्षेत्रात विशेष भर पडली आहे. 
जुळे सोलापुरातील म्हेत्रे टॉवर इथल्या अद्ययावत सेवा सुविधांनी परिपूर्ण अशा या नूतन कार्यालयचं उद्घाटन बँक ऑफ बडोदाच्या पुणे विभागाच्या महाव्यवस्थापक श्रीमती मिनी टी. एम, यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी बँकेच्या या नूतन कार्यालयाची पहाणी करुन मनापासून आनंद आणि समाधान व्यक्त केलं. कार्यालयाची विशेष अशी सजावट या निमित्त करण्यात आली होती. या प्रसंगी क्षेत्रीय प्रमुख सोलापूर क्षेत्र  संजीवन कुमार, सहाय्यक महाव्यवस्थापक अकलूज शाखा, जनार्दन निजासुरे, सोलापूर मुख्य शाखेचे मुख्य व्यवस्थापक आर कार्तिकेन, मुख्य व्यवस्थापक, एसएमई विभाग गौरव जगताप, यांची प्रमुख उपस्थिती होती. 
दरम्यान बँक ऑफ बडोदा ही ग्राहकांना तप्तर आणि अद्ययावत सेवा सुविधा देण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, सोलापूरच्या ग्राहकांनी नेहमीचं बँकेला सहकार्य करुन बँकेच्या प्रगतीसाठी मोलाची साथ दिली आहे, अशा भावना या निमित्त श्रीमती मिनी टी. एम. यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या. यापुढील काळातही बँक आणि ग्राहकां मधील नातेसंबंध हे अधिक दृढ होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त करताना, बँकेच्या उत्कृष्ट सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन ही त्यांनी केलंं.
बँक ऑफ बडोदाच्या नवीन सोलापूर क्षेत्रामध्ये सोलापूर, सातारा, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांचा समावेश असून एकूण 49 शाखांद्वारे बँक आपल्या ग्राहकांना सेवा देत आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करताना त्यांना चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी बँकेचा विशेष भर आहे. बँकेच्या विविध कर्ज योजना या अल्प व्याजदरात उपलब्ध असून, ग्राहकांना याचा अधिकाधिक लाभ होईल अशी आशा या निमित्त संजीवन कुमार यांनी व्यक्त केली. यावेळी ग्राहकांची तसचं विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांनी यानिमित्त आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments