ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात सभा आयोजित केली होती. पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. त्यामुळे अंधारेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेत, शिंदे गटाच्या पाटलांवर टीका केली. अंधारेंच्या या टीकेनंतर पाटलांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणले, अशा शब्दांत पाटील यांनी अंधारे यांच्यावर टीका केली.
मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही, म्हणून ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणले. अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे, असा शब्दांत मंत्री पाटील यांनी उध्दव ठाकरे, अंधारे यांच्यावर केला.
