महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नेते सहभागी झाले. यावेळी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सडूकन टीका केली आहे.
शिंदे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. भाजपसारखा मुर्ख पक्ष आजवर पाहिला नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. हा मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठीचं पहिल पाऊल आहे, राज्यपालांना एक मिनिट सुद्धा खुर्चीवर बसण्याच्या अधिकार नाही, असे राऊत म्हणाले.