‘या’ 5 कारणांमुळे Samsung Galaxy S25 ठरतो तुमच्या स्वप्नातील फोन : पावर, परफॉर्मन्स आणि प्ले Galaxy S25 मध्ये आहे सर्वकाही!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Samasung Galaxy S25 हा स्मार्टफोन उत्तम डिझाइन, पावरफुल एआय आधारित फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. यातील पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर, प्रभावी कॅमेरा सेटअप आणि मजबूत सिक्योरिटी फीचर्स या डिवाइसला स्वप्नवत बनवतात.

आपण कमी प्रकाशात फोटो काढण्याचा प्रयत्न करतो आणि तो ब्लर निघतो, अशी वेळ आपल्या सर्वांवर कधी ना कधी आली असेलच. किंवा उन्हात डोळे बारीक करून स्क्रीनवर काय आहे हे पाहण्याचा खटाटोप आपणही केला असेल. आणि जेव्हा जास्त गरज असते तेव्हा फोनची बॅटरी 10 टक्क्यांच्या खाली जाते तेव्हा उडणारी तारांबळ सर्वांनी कधी ना कधी अनुभवली असेल.

सॅमसंगला याची जाणीव आहे. म्हणूनच Samsung Galaxy S25 फक्त एक स्मार्टफोन नसून या सर्व समस्यांवरील भरभक्कम उपाय आहे. शानदार नवीन डिजाइन, पावरफुल एआय आधारित फीचर्स आणि आवश्यक अपग्रेडच्या जोरावर बनवण्यात आलेला हा फोन तुम्हाला कधीच दगा देत नाही. चला जाणून घेऊया Samsung Galaxy S25 तुमच्या पॉकेटमध्ये जागा मिळवण्याचा का पात्र आहे?

1. शानदार आणि मजबूत डिस्प्ले

सॅमसंगचा 6.9-इंचाचा क्यूएचडी+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले आधीपेक्षा जास्त शार्प, ब्राइट आणि स्मार्ट आहे. याच्या इमेज क्वॉलिटीमध्ये 43% सुधारणा करण्यात आली आहे त्यामुळे शॉर्ट व्हिडीओ असो किंवा तुमच्या आवडीचा अ‍ॅक्शनपट असो, तुमची स्क्रीनवरील नजर हटणार नाही. भर उन्हात किंवा एखाद्या डिम लाइट असलेल्या खोलीत, कुठेही फोनवर स्क्रोल करताना यातील व्हिजन बूस्टर आपोआप अड्जस्ट करून तुम्हाला परफेक्ट व्ह्यू देईल. बऱ्याचदा उन्हात शो पाहताना तुम्हाला तुमचेच प्रतिबिंब दिसले असेल, परंतु आता तसं होणार नाही.

फक्त लुक्स म्हणजे डिस्प्ले नाही, हा मजबूत देखील आहे. हा डिस्प्ले दणकट टायटेनिक फ्रेममध्ये बसवण्यात आला आहे त्यावर कॉर्निंग गोरिल्ला आर्मर 2 ची लेयर दिल्यामुळे Galaxy S25 आधीपेक्षा जास्त मजबूत झाला आहे. त्यामुळे फोन फुटपाथ वर पडला तरी काळजी करण्याची गरज नाही. सोफ्यावरून सरकला तरी हा फोन सुरळीत चालेल. हा फोन म्हणजे स्टाईल, ताकद आणि अस्थेटिक मजबुतीचा संगम आहे.

2. DSLR बाजूला ठेवायला लावणारा कॅमेरा

Galaxy S25 मधील कॅमेरा सेटअप त्यांच्यासाठी परफेक्ट आहे ज्यांना आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅप्चर करायला आवडतो. यातील 200MP ची मुख्य लेन्स प्रत्येक शॉट क्रिस्प असेल याची काळजी घेतो, तर 5x ऑप्टिकल झूम असलेली 50MP टेलीफोटो लेन्स दूरवरील सब्जेक्टवर देखील अगदी स्पष्टपणे फोकस करते. लो लाइट फोटोग्राफी करायची आहे? सॅमसंगमधील नाईटोग्राफी मोड तुम्ही रात्री काढलेले फोटो हॉरर मुव्हीमधील सीन्स प्रमाणे ब्लरी दिसणार नाहीत याची काळजी घेतो.

यातील प्रोव्हिज्युअल इंजिन फोटो आणि व्हिडीओ एन्हान्स करतो आणि प्रत्येक क्रिएटरला प्रोफेशनल दर्जाची क्वॉलिटी देतो. जेन एडिट सारखे एआय आधारित फिचर फोटो मधील नको असलेल्या वस्तू काढून टाकण्यास मदत करतो आणि एडिट सजेशन चांगला शॉट कॅप्चर करण्यासाठी एक्सपर्ट टिप्स देतो.

सेल्फीसाठी या फोनमधील फ्रंट कॅमेऱ्यात एआय एन्हान्स स्किन रेकग्निशन देण्यात आले आहे त्यामुळे भरपूर डेंटिलिंगसाठी फोटो कॅप्चर होतात. तसेच एआय पावर्ड 10-बिट एचडीआर व्हिडीओ फिचरच्या मुळे Galaxy S25 तुम्ही शूट केलेला प्रत्येक व्हिडीओ सिनेमॅटिक, व्हायब्रन्ट कलर्स आणि स्मूद ट्रांजीशन देईल याची खात्री देतो. त्यामुळे हा फोन फक्त रोजच्या आयुष्यातील क्षण नव्हे तर क्रिएटिव्ह प्रोजक्ट शूट करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

3. दमदार पावर आणि परफॉर्मन्स

शक्तिशाली Snapdragon® 8 Elite मोबाइल प्लॅटफॉर्मच्या जोरावर Galaxy S25 नं स्मार्टफोन परफॉर्मन्सची व्याख्याच बदलून टाकली आहे. हा फोन गेमिंग, मल्टिटास्किंग आणि फोटो एडिटिंग अगदी सहज हाताळतो. व्हल्कन इंजिन आणि रे ट्रेसिंग क्षमतेच्या जोरावर Galaxy S25 गेमिंग अधिक इमर्सिव्ह आणि स्मूद बनवतो. मग वजनदार ग्राफिक असलेले गेम खेळा किंवा एकावेळी अनेक अ‍ॅप्स वापरून मल्टिटास्किंग करा, हा फोन नेहमीच एक लॅग फ्री अनुभव देईल. 3नॉन मीटर फॅब्रिकेशनवर बनलेला स्नॅपड्रॅगन जेन 8 एलिट प्रोसेसर आणि 12GB रॅम एकत्रितपणे सर्वकाही न अडखळत चालेल याची खात्री देतात. तर गॅलेक्सी हिट डिसिपेशन आर्किटेक्चर फोन थंड राहील याची काळजी घेतो.

Galaxy S25 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी गेमिंग, स्ट्रीमिंग किंवा मल्टीटास्किंग करताना एक क्षणभर देखील दगा देत नाही. तसेच यात सुपरफास्ट चार्जिंग 2.0 देण्यात आली आहे त्यामुळे काही मिनिटांत पुन्हा कामाला लागू शकता. दुसरा डिवाइस चार्ज करायचा आहे? यातील वायरलेस पावरशेअरच्या मदतीनं तुम्ही इतर गॅजेट्स अगदी सहज चार्ज करू शकता.

4. AI करणार आयुष्य सोपे

Galaxy S25 फक्त स्मार्ट नाही तर इंटेलिजंट पण आहे. तुमच्या पेटचा समुद्र किनाऱ्यावरील जुना फोटो शोधून काढायचा असो किंवा भल्यामोठ्या ईमेल थ्रेड मधून महत्वाचे मुद्दे निवडायचे असो, हा फोन तुमचे आयुष्य खऱ्या अर्थाने सोपे करण्यासाठी डिजाइन करण्यात आला आहे. तुम्हाला फक्त फोनला विचारायचे आहे. कॉल ट्रान्सक्रिप्टचेच उदाहरण घ्या ना – हे फिचर तुम्हाला तुमच्या स्मृतीला ताण न देता घडलेला संवाद आठवण्यास मदत करते. रायटिंग असिस्ट तुम्हाला प्रोफेशनल आणि पॉलिश मेसेज, ईमेल आणि नोट्स लिहिण्यास मदत करतो. तर ड्रॉयिंग असिस्ट तुमच्या कच्च्या स्केचला सुंदर दृश्यांमध्ये रूपांतरित करून क्रिएटिव्हिटी जिवंत ठेवतो.

व्हिडीओसाठी देखील Galaxy S25 तुमच्या पर्सनल एडिटर सारखी कामगिरी करतो. यातील ऑटो ट्रिम फिचर अनावश्यक फुटेज आपोआप कट करतो, त्यामुळे एक स्वच्छ, शेअर करण्याजोगी क्लिप मिळते. तर यातील ऑडिओ इरेजर व्हिडीओ मधील अनावश्यक बॅकग्राउंड नॉइज काढून टाकतो आणि व्हिज्युअल्स इतकाच क्लिअर ऑडिओ मिळवून देतो. ही एक प्रॉडक्टिव्हिटी टूल्सची टीम आहे जी पडद्यामागे काम करत असते आणि तुम्ही जे कराल ते शानदार दिसेल याची खात्री देते.

5. प्रायव्हसी आणि सिक्योरिटी – तुमचा डेटा, तुमचे नियंत्रण

तुमच्या फोनमध्ये तुमची बरीच खाजगी माहिती असते आणि ती सुरक्षित ठेवणे किती महत्वाचे आहे हे सॅमसंगला माहित आहे. म्हणूनच Galaxy S25 मध्ये Knox Vault इन्क्रिप्शनसह 360 Security suite देण्यात आला आहे.

फोनमधील ऑटो ब्लॉकर अनावश्यक डेटा किंवा लिंक्स आपोआप फिल्टर करतो आणि कंट्रोल करता येणाऱ्या क्लाउड आधारित एआयच्या मदतीनं तुम्ही तुमचा डेटा गॅलेक्सी डिवाइसेसवर कसा शेअर होईल यावर नियंत्रण ठेऊ शकता.

आणखी काय? एक्सक्लुसिव्ह कलर्स आणि अनेक फायदे!

Galaxy S25 सीरिज म्हणजे फक्त अत्याधुनिक टेक्नॉलॉजी नाही तर एक स्टाइल स्टेटमेंट आहे. टायटेनियम सिल्व्हरब्लू, टायटेनियम ब्लॅक, टायटेनियम व्हाइट आणि टायटेनियम ग्रे असे शानदार रंग अल्ट्रा मॉडेलमध्ये मिळतात आणि टायटेनियम जेट ब्लॅक, टायटेनियम जेडग्रीन आणि टायटेनियम पिंकगोल्ड हे एक्सक्लुसिव्ह रंग Samsung.com वर उपलब्ध आहेत.

तर तर Galaxy S25+ आणि Galaxy S25 नेव्ही, आईस ब्लू, सिल्व्हर शॅडो आणि मिंट कलरमध्ये उपलब्ध आहेत, तसेच Samsung.com वर टायटेनियम ब्लू ब्लॅक, टायटेनियम कोरल रेड आणि टायटेनियम पिंक गोल्ड असे एक्सक्लुसिव्ह कलर उपलब्ध आहेत. हे डिवाइस फक्त स्टायलिश नाहीत तर पावरफुल देखील आहेत आणि एक्सक्लुसिव्ह रंग तुमची डिवाइस पर्सनलायज करण्याची संधी देतात, ज्यातून तुम्ही तुमची स्टाइल दाखवू शकता.

आता फक्त 3612 रुपये/महिना देऊन तुम्ही नवीन Galaxy S25 Ultra (256GB) वर अपग्रेड करू शकता आणि दर्जेदार परफॉर्मन्स, शानदार डिस्प्ले आणि अत्याधुनिक फीचर्सची मजा घेऊ शकता. जर तुम्हाला दमदार व्हॅल्यू हवी असेल तर Galaxy S25 (256GB) सध्या फक्त 2250 रुपये/महिना मध्ये उपलब्ध आहे, जो अद्वितीय पावर शानदार किंमतीत देतो.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सॅमसंगच्या वेबसाइटला भेट द्या. स्मार्टफोनचे भविष्य आलं आहे, तुम्हाला अनुभवायचं आहे का?

Disclaimer: The article has been produced on behalf of Samsung by the Times Internet’s Spotlight team.

 

इतर महत्वाच्या बातम्या

60 दिवसांचा Airtel प्रीपेड प्लॅन, अहो दोन महिने रिचार्जचं नो टेन्शन, फायदे वाचा

मराठी राजभाषा दिन : “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा…” अशा द्या तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, आज तुमच्या खात्यात…

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon