नागरिकांना केवळ ५०० रुपयांत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल केली आहे. दारिद्र्यरेषेखालील आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना ५०० रुपयांत सिलेंडर दिला जाणार असून वर्षात १२ सिलेंडर दिले जाणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भरात जोडो यात्रेत गहलोत यांनी ही घोषणा केली आहे. या नव्या योजनेत नागरिकांना ‘रसोई किट’ देखील दिली जाणार आहे. यात स्वयंपाक घरातील वस्तु दिल्या जाणार आहेत. पुढील वर्षी १ एप्रिलपासून ही योजना लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे राजस्थानच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.