Saturday, September 21, 2024
Homeindia worldमोदींची कर्तव्यनिष्ठा! आईच्या निधनानंतर २ तासात कामाला सुरूवात, सरदार पटेलांशी होत आहे...

मोदींची कर्तव्यनिष्ठा! आईच्या निधनानंतर २ तासात कामाला सुरूवात, सरदार पटेलांशी होत आहे तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे शुक्रवारी निधन झाले. आईच्या अंतिम संस्कारानंतर लगेचच मोदी पुन्हा कर्तव्यावर परतले. हावडा आणि जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. मोदींची ही कर्तव्यदक्षता पाहून सोशल मीडियावर अचानक सरदार वल्लभभाई पटेल यांची चर्चा सुरू झाली.
ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींनी आपल्या आईच्या निधनानंतरही विचलित न होता आपले कर्तव्य बजावले, सरदार वल्लभभाई पटेल यांनीही असेच काहीसे केले होते. ही गोष्ट साधारण 
१९०९ सालची. तेव्हा सरदार पटेलांनी गोध्रा येथे वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली होती. ही गोष्ट आहे ११ जानेवारी १९०९ ची. सरदार न्यायालयात एका खटल्यात युक्तिवाद करत होते. दरम्यान,त्याना एक तार आली. ती त्यांनी उघडली, वाचली व पुन्हा बॅगेत ठेवली. यानंतर न्यायालयात सुमारे दोन तास युक्तीवाद सुरू होता. शेवटी सरदार पटेल ही केस जिंकले. 
सुनावणी संपल्यानंतर न्यायाधीश आणि इतरांनी सरकार पटेलांना त्या तारबद्दल विचारले. त्यामध्ये पत्नीच्या मृत्यूची बातमी असल्याचे पटेल यांनी सांगितल्यावर तेथे उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. यावर सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले की,मी त्यावेळी कुणाला तरी न्याय मिळवून देण्यासाठी वकिलाचे कर्तव्य करत होतो. जर मी युक्तीवाद अर्धवट सोडला असता तर तो माझ्या क्लायंटवर अन्याय झाला असता.
त्यांचे हे वाक्य ऐकून सर्वांनी सरदार पटेल यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले. त्यांची पत्नी झवेर बेन यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. येथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पंतप्रधान मोदींच्या आईचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. आज मोदी ७,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमासाठीपंतप्रधान मोदी पश्चिम बंगालला जाणार होते. मात्र आईच्या निधनानंतर त्यांना अहमदाबादला यावे लागले. पंतप्रधान सकाळी ९.३० वाजता अहमदाबादला पोहोचले आणि त्यांनी हिराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि सकाळी ११.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोलकातामधील कार्यक्रमांना संबोधित केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments