Saturday, September 21, 2024
Homepoliticalमोठी बातमी! अजितदादा पुन्हा नॉट रिचेबल

मोठी बातमी! अजितदादा पुन्हा नॉट रिचेबल

शिंदेंसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार फुटल्यानंतर काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याची चर्चा रंगली होती. आता काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचं बोललं जातंय. त्याला कारणही तसंच आहे. 

राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या शिबिरातून अजित पवार आजोळी गेल्याचं सांगितलं जात असलं तरी पवार अचानक पाच दिवसांपासून नॉट रिचेबल झाले. गेल्या पाच दिवसांपासून पवार कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. परंतु पवार शिर्डीच्या शिबिरातूनच 4 नोव्हेंबर रोजी आजोळी देवळाली प्रवराला गेल्याची कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. 
खरं तर पवार अद्यापही देवळाली प्रवराला पोहोचलेच नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही स्वतः शरद पवारांनी रुग्णालयातून शिर्डीत हेलिकॉप्टरने येत हजेरी लावली होती. परंतु त्या राज्यस्तरीय शिबिरानंतर अजितदादा कुठेही दिसलेले नाहीत. नेहमीच मीडिया आणि बातम्याच्या गराड्यात राहणारे पवार अचानक पाच दिवस गायब झाल्यानं नव्या चर्चांना उधाण आले आहे. 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments