टी 20 विश्वचषकात साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स असा झाला. या विजयासह उपांत्य फेरीत पोहोचण्याचे आफ्रिकेचे लक्ष होते. मात्र, नेदरलँड्सने अविश्वसनीय खेळ दाखवत विजेतेपदाचे दावेदार असलेल्या आफ्रिकेला 13 धावांनी पराभूत करत अपसेट घडवला.
या पराभवामुळे आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून, भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यासोबतच बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान हा पुढील सामना उपांत्यपूर्व फेरी सारखा खेळला जाईल. या सामन्यात विजेता होणारा संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल.