टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ हा सकाळी स्वत: गाडी चालवत घरी जात होता. यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची कार दुभाजकाच्या रेलिंगला धडकली. यानंतर ऋषभच्या कारला आग लागली.
त्याला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत याला कुठलाही धोका नाही. ऋषभने सांगितले की, त्याला गाडी चालवतांना झोप आली होती. मध्येच एक डुलकी आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी दुभाजकाला जाऊन धडकली. यानंतर त्याच्या गाडीने पेट घेतला. सुदैवाने तो अपघातात थोडक्यात बचावला.