भारतीय संघ टी-20 विश्वचषकमधून बाहेर पडला. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर 130 कोटी भारतीय चाहत्यांची निराशा झाली.
सोबतच संघातील खेळाडू देखील चांगले नाराज असल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा याला पराभवामुळे डोळ्यांतील पाणी अनावर झाल्याचेही दिसले. रोहित डगआऊटमध्ये बसून रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 20 षटकांमध्ये भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडसाठी सलामीला आलेला कर्णधार जोस बटलर आणि ऍलेक्स हेल्स यांनी जबरदस्त प्रदर्शन केले. या दोघांनी संघाला विजय मिळवून देत शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले.
इंग्लंडने 16 व्या षटकात हा सामना जिंकला. सुरुवातील भारतीय संघाचे पारडे सामन्यात जड वाटत होते, पण गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. रोहितने पराभवाचे खापर देखील गोलंदाजांवर फोटले. सामना संपल्यानंतर जेव्हा रोहित डग-आऊटमध्ये गेला, तेव्हा त्याला अश्रृ अनावर झाले. रोहित रडतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.