ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या महिला पत्रकाराला भरधाव कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. यात महिला पत्रकाराचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे पत्रकारिता क्षेत्रावर दुखाचा डोंगर कोसळला असून देशभरात या घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे.निवेदिता सूरज असे महिला पत्रकाराचे नाव असून त्या ईटीव्ही भारत तेलुगूमध्ये काम करत होत्या. त्यांच्या निधनानंतर आता हैदराबादेतील रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निवेदिता या हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये ऑफिसला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सहकारी पत्रकार सोनाली चौरे यांच्यासोबत भाग्यलता कॉलनीतील रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भरधाव कारने धडक दिली. या घटनेत निवेदिता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून सोनाली यांना गंभीर मार लागला आहे.