गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या महागाईपासून नव्या महिन्यात दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दरांत कपात करण्यात आली आहे. आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ११५ रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १६९६ झाली आहे.
याची आधी किंमत १८४४ रुपये होती. दरम्यान, ही कपात फक्त व्यावसायिक सिलेंडर दरांत करण्यात आली असून घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आयओसीएलच्या मते, १ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या इंडेनच्या १९ किलो व्यावसायिक सिलेंडर दरात ११५.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे.
तर, कोलकत्ता येथे ११३ रुपये, मुंबईत ११५.५ रुपये आणि चैन्नईत ११६.५ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलेंडर दरांत २५ रुपयांनी कपात करण्यात आली होती.