पुण्यातील नवले पुलावर भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिली. काल रात्री ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने या घटनेत दहा लोक गंभीर जखमी झाले आहेत.
- या अपघातात ४८ पेक्षा जास्त गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.
- अपघातानंतर पुणे पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.
आज सकाळी नवले पुलानजीक पुन्हा एक अपघात झाल्याची माहिती आहे. यात एक जण ठार झाल्याने, एकामागून एक अपघात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.