दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

24 फेब्रुवारी 2025 | सोमवार

 

  • नीलम गोर्‍हे निर्लज्ज, नमकहराम बाई, संजय राऊतांचं टीकास्त्र, मातोश्रीवर 2 मर्सिडीज दिल्यावरच पद मिळतं, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक

  • निलम गोऱ्हेंना निर्लज्ज म्हणता, तुम्हाला लाज वाटते का? मंत्री संजय शिरसाटांनी संजय राऊतांना चांगलंच सुनावलं

  • नीलम गोऱ्हेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार; सुषमा अंधारे कडाडल्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव ! संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा आवर्जून उल्लेख

  • कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना दिलासा, बेकायदा सदनिकाप्रकरणी तात्पुरता जामीन मंजूर; नाशिक सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती

  • डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा ‘आका’ ठाण्यात बसतोय; मनसेच्या राजू पाटलांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह पुत्र श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप

  • मंत्री संजय शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका, अंबादास दानवेंचा शिवसेना नेत्याला इशारा

  • कुंभमेळ्याहून परतताना मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच बेळगावमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, ‘PM किसान योजने’चे पैसे खात्यात

  • महाराष्ट्रात ग्रामीण भागातील घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती

  • उष्माघाताचा पहिला बळी, सांगलीत परप्रांतीय बर्फगोळा विक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या, शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात

  • संजय राऊत जे बोलले ते शंभर टक्के बरोबर: नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे, असे भाष्य करायला नको होते, शरद पवारांची टीका

  • साहित्य संमेलनातील वक्तव्यांवरून फडणवीसांचे खडे बोल: राज-उद्धव भेटीचे स्वागत; संजय राउतांना भोंगा म्हणत मंत्री कोकाटेंनाही टोला

  • गुंड गजा मारणेला अटक: मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे भोवले, पुणे पोलिसांचा टोळीवर मकोका

  • नीलम गोऱ्हेंनी तिकिटासाठी पैसे घेतले: ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे म्हणाले – ही बाई कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहचू देत नव्हती

  • मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिला: आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा ते ठरवतात, आमच्या हातात काही नाही – कृषिमंत्री कोकाटे

  • श्रेयस म्हणाला- पाकविरुद्धचा कोणताही विजय चांगला असतो: मला कधीच वाटले नाही की विराट धावांसाठी संघर्ष करतोय, त्याला धावांची भूक आहे

  • रोहित म्हणाला- विराटला देशासाठी खेळायला आवडते: कोहली म्हणाला- 36व्या वर्षी ऊर्जेची गरज असते; 280+ असते तर बरे झाले असते- रिझवान

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon