- शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे काही नावच घेत नाही. बेशरम रंग हे गाणं चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. आता अयोध्येच्या एका संतांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या चित्रपटाला विरोध करत संत जगद्गुरु परमहंस आचार्य महाराजांनी शाहरुखला थेट धमकी देत त्याची कातडी सोलण्याची भाषा वापरली आहे.
पठाण चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी विचारपूर्वक रणनीती आखून पैसे कमविण्याचा लोकांनी धंदा केला आहे. हा चित्रपट जिहाद आहे. आज आपण शाहरुखचे पोस्टर जाळले आहे. ज्या दिवशी शाहरुख भेटेल त्या दिवशी त्याला जिवंत जाळून टाकेन, असे वादग्रस्त वक्तव्य आचार्य महाराज यांनी केले आहे.
… तर शाहरुख खानला जिवंत जाळेन
RELATED ARTICLES