Sunday, October 6, 2024
Homepoliticalठाकरे सरकार पाडण्यासाठी पैसा कुणी पुरविला?

ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैसा कुणी पुरविला?

निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली असून राज्य शासनाने या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती केली आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिंदे गटावर शरसंधान केले आहे. 

महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभार लागला आहे. त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्यमंत्र्यांनी आशर यांची प्रतिष्ठापना केली, पण त्यात महाराष्ट्राचे काय भले होणार? महाराष्ट्रातून गुजरातेत पळवून नेलेले उद्योग या महाशयांनी पुन्हा परत आणायला हवेत, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बिल्डर आशर यांना ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या आशर महाशयांसाठीच. महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ज्ञ, आर्थिक क्षेत्रातील जाणकार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या आशर यांना, अशी बोचरी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments