Sunday, October 6, 2024
Hometop newsजितेंद्र आव्हाड यांनी मला गच्च धरून...

जितेंद्र आव्हाड यांनी मला गच्च धरून…

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आज सकाळी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी पक्ष आक्रमक बनला आहे. आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी आपल्या पतीच्या समर्थनार्थ मैदानात येऊन जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली.

तर दुसरीकडे या  या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आपल्याकडे दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिली. याच दरम्यान व्हिडिओतील त्या महिलेने पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रसंगाची माहिती मीडियाला दिली. रिदा राशीद असे या तक्रारदार महिलेचे नाव आहे.
कालचा ठाणे कळवा पुलाच्या उद्घाटन प्रसंगी घडला आहे. कालचा घटनाक्रम सांगताना रिदा म्हणाल्या.
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला उभी होते. त्यावेळी भलीमोठी गर्दी झाली होती. उद्घाटन झाल्यानंतर शिंदे जायला निघाले. त्यांना भेटण्यासाठी मी पुढे निघाले. पीएकडून मी शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीला चिकटून दरवाजाजवळ उभे होते.
एवढ्यात आव्हाड तेथे आले. ते स्थानिक आमदार असल्यामुळे मी त्यांच्याकडे बघून स्मितहास्य केले. दरम्यान त्यांनी मला तू इथे काय करतेस, असे म्हणून मला गच्च पकडून ढकलून दिले. मला अक्षरशः पुरुषांच्या अंगावर ढकलले,  असा आरोप रीदा यांनी केला. आव्हाड यांनी हात लावल्यावर मला जी फिलिंग झाली आहे ती पोलिसांना सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments