राज्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी एक खुशखबर आहे. ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. परिचारिका पदाच्या 49 जागा भरण्यात येतील.
बारावी उत्तीर्ण किंवा नर्सिंग कोर्स केलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जी. एन. एम. ही पदवी असणे आवश्यक आहे. बीएससी नर्सिंग उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 वर्षांपर्यंत असावे.
विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नसून द्वारे ही निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. इच्छुकांनी मुलाखतीसाठी 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.