Sunday, September 8, 2024
Homejobsखुशखबर! बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 4500 सरकारी नोकऱ्या

खुशखबर! बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 4500 सरकारी नोकऱ्या

सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्रीय विभाग आणि मंत्रालयांमध्ये बंपर भरती सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, संबंधित विभाग आणि कार्यालयांमध्ये लेव्हल-2, लेव्हल-4 आणि लेव्हल-5 च्या सुमारे 4,500 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मान्यताप्राप्त मंडळातून बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी जाहिरात केलेल्या 4,500 सरकारी नोकऱ्यांमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क / कनिष्ठ सचिवीय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि डेटा एंट्री ऑपरेटर (ग्रेड A) यांचा समावेश आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) परीक्षा 2022 द्वारे केली जाईल.
स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे जाहिरात केलेल्या या 4.5 हजार पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले बारावी पास उमेदवार आणि कमाल वय 27 वर्षे आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात.

अर्जासाठी वेबसाइटला भेट दिल्यानंतर उमेदवारांना प्रथम मुख्यपृष्ठावर दिलेल्या लॉगिन विभागात नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉगइन करावे लागेल. यानंतर, उमेदवार संबंधित परीक्षेसाठी अर्ज सादर करू शकतील. अर्जाची फी 100 रुपये आहे. 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments