आता वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच पेट्रोल-डिझेल दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने भारतात पेट्रोल-डिझेल दरात कपात होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 2 रुपयांची कपात होऊ शकते. गेले सहा महिने पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मुबंई, दिल्ली, कोलकत्ता आणि चेन्नईमध्ये हे दर स्थिर होते. सध्या गुजरात आणि हिमाचल राज्याच्या निवडणूका जवळ आल्या आहेत.
तसेच मुंबईमध्ये देखील निवडणुका जाहिर होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर देखील पेट्रोल-डिझेल दरात कपात होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.07 प्रति लिटर, अशी आजची किंमत आहे.
        संबंधित बातम्या
                        मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं
                    
                        दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 20 ऑक्टोबर 2025 | सोमवार
                    
                        गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ, सहा मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं
                    
                        निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं? राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले
                    
                        Raj Thackeray And Uddhaठाकरे बंधू आज पुन्हा भेटले, राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
                    
				



