भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने न केवळ भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला नाही, तर आपल्या नावावर एक विश्वविक्रमही केला आहे. कोहली भारतासाठी टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरला आहे.
कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केली. या खेळीबरोबरच विराटने टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. जगात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत कोहलीने कर्णधार रोहित शर्माला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले आहे.
कोहलीच्या नावावर आता टी २० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ३७९४ धावा केल्या आहेत. तर रोहित ३७४१ धावांनी दुसऱ्या नंबरवर आहे. टी २० विश्वचषकाच्या इतिहासात महेला जयवर्धने याच्या नावावर सर्वाधिक १०१६ धावा आहेत.
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकत विराटने इतिहास रचला. कोहलीने ५३ चेंडूंचा सामना करत एकूण सहा चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत कोहलीने ४८ धावा तर फक्त १० चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या.