कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला होता. आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावाबाबत वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राची मुंबईच मागायची राहिली आहे की काय कळत नाही, अशा शेलक्या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्र असा तसा वाटला का तुम्हाला? आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावाबाबत वक्तव्य केले. काहीही संबंध नसताना अशाप्रकारचे वक्तव्ये करून लोकांचे लक्ष विचलीत करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत कडक भाषेत प्रत्युत्तर दिले पाहिजे. याआधी अशी वक्तव्ये होत नव्हती. महाराष्ट्राची मुंबईच मागायची राहिली आहे की काय कळत नाही, असे पवार म्हणाले.