उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे शिंदे गटातील आमदार बच्चू कडू संतापले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रवी राणा यांच्याकडून कडू यांच्यावर बेछूट आरोप सुरु आहेत. बच्चू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा गंभीर आरोप राणा यांनी केला होता.
- या विरोधात दाद मागूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी या प्रकरणात अद्याप हस्तक्षेप केलेला नाही. आता कडू यांनी, ‘एक तारखेला ट्रेलर असेल. त्यानंतर चित्रपट १५ दिवसांनी पूर्ण होईल,असं वक्तव्य करत थेट इशारा दिला आहे.
मी नंगा होईन, मला त्याची काही फिकर नाही. कडूचं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर. आम्हाला राजकारण सोडावं लागलं तरी बेहत्तर. उद्या राजकारण सोडावं लागलं, तरी मला काही अडचण नाही. ही आरपारचीच लढाई आहे. तुम्ही असे आरोप करत असाल, तर आम्ही आंडूपांडू थोडी आहोत? जमिनीत नांगर घालणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहोत आम्ही. आम्ही घालून टाकू नांगर, अशा शब्दांत कडूंनी राणांना सुनावलं आहे.
संबंधित बातम्या

Raj Thackeray on Election Commission: लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला

वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज

थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार

आता महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांतही ‘एनसीसी’ प्रशिक्षण; क्रीडामंत्री कोकाटे यांची घोषणा

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर