Saturday, September 21, 2024
Homeindia worldएक जानेवारीपासून एक हजाराची नोट चलनात येणार?

एक जानेवारीपासून एक हजाराची नोट चलनात येणार?

2016 रोजी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या वर टीका करण्यात आली. सध्या दोन हजाराच्या नोटा चलनात नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर एटीएम  मधून सुद्धा 2000 नोटा निघत नाहीत. दोन हजाराच्या नोटा बंद पडल्याच्या अफवा सध्या पसरत आहेत. तसेच एक जानेवारीपासून एक हजाराच्या नोटा चलनात येतील अशीही शक्यता आहे.

दरम्यान याचा एक व्हिडिओ जबरदस्त वायरल होत आहे. एक जानेवारीपासून एक हजाराची नोट पुन्हा चलनात आहे, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
तसेच दोन हजाराची नोट बँका माघारी घेतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र व्हायरल झालेला हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर येत आहेत. एक हजाराची नोट नव्याने बाजारात येण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे अशा फेक न्युजवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments