टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जगात हाहाकार! रशियाची 40 टक्के तेलाची निर्यात ठप्प, भारतात होणारा तेल पुरवठा…

Follow Us:
Russia crude oil supply

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात असतानाच अजून एक मोठा धक्का बसला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. भारतालाही याचा थेट फटका बसणार आहे.

जगात हाहाकार! रशियाची 40 टक्के तेलाची निर्यात ठप्प, भारतात होणारा तेल पुरवठा...

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. यानंतर युद्धाला सुरूवात झाली. या युद्धात जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा भाव गगणाला पोहोचला. यानंतर रशियाच्या तेलावर निर्बंध घालणाऱ्या अमेरिकेने मोठा निर्णय घेत 30 दिवसांकरिता रशियाच्या तेलावरील सर्व निर्बंध हटवले आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन केले. त्यापूर्वी रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता अमेरिकेकडून मोठा दबाव भारतावर होता. यादरम्यान भारताने पुन्हा एकदा रशियाकडून तेल खरेदी केली पण यावेळी रशियाकडून भारताला तेलावर कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आली नाही. बाजार भावाप्रमाणेच भारताला रशियाकडून तेल खरेदी करावे लागत आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. यादरम्यानच भारताच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध संपण्याचे संकेत असताना मोठा धक्का बसला. युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्यामुळे भारताला धक्का बसला. युक्रेनने मोठा हल्ला रशियाच्या तेल पाईपलाईनवर केला. त्यामध्येच मोठे नुकसान झाले. यासोबतच रशियाचे अनेक टॅंकरही जप्त केले आहेत. यामुळे रशियाच्या तेल निर्यात क्षमतेवर 40 टक्के हिस्सा ठप्प झाला. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल निर्यात देश असलेल्या रशियावर हे युक्रेनमुळे गंभीर संकट आले.

युक्रेनकडून अशावेळी रशियाच्या कच्च्या तेलासंबंधित पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला, ज्यावेळी जागतिक बाजारपेठेत अगोदरच कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलवरच्या पुढे पोहोचल्या आहेत. रशियाचा तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने त्याचा थेट भारतावर परिणाम होतो. सध्याच्या घडीला भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करत आहे. अमेरिकेने रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवल्यानंतर भारताला थेटपणे फायदा होताना दिसला. पण आता पुन्हा एकदा संकट आलंय.

जर रशियाकडून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झाला तर भारतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. भारत अगोदरच एलपीजी गॅसच्या संकटातून मार्ग काढताना दिसत आहे. एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. रशियाकडून भारतात कच्चे तेल पाठवले जात आहे. पण आता युक्रेनकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर भारतासोबतच इतरही काही देशांच्या चिंतेत वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

Gold Price Today 27 March 2026: ‘मोठी उसळी’! सोनं 1.41 लाखांच्या पुढे; चांदीतही जबरदस्त वाढ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now