Women Final: कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी आजचा दिवस “करो या मरो” पेक्षा कमी नाही. 2017 मध्ये लॉर्ड्सवर तिच्या 51 धावा आणि तो पराभव अजूनही मनात खोलवर कोरलेला आहे.

India Women vs South Africa Women Final: ते वर्ष होते 2005, मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. पण ऑस्ट्रेलियाने सेंच्युरियनवर 98 धावांनी दणका दिला. 2017 मध्ये पुन्हा मितालीच्या नेतृत्त्वाखाली लॉर्ड्सवर अंतिम फेरी, पण इंग्लंडकडून फक्त 9 धावांनी अपयश आणि आता 2025 तारीख 2 नोव्हेंबर, नवी मुंबईचे डीवाय पाटील स्टेडियम इतिहासाचा साक्षीदार ठरणार का? याची उत्सुकत आहे. भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. पहिल्यांदाच ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड अंतिम फेरीत पोहोचला आहे! हा आफ्रिकेची पहिली विश्वचषक फायनल आणि भारतासाठी सुद्धा सुवर्णसंधी आहे.

शौर्याची पुनरावृत्ती करण्याची संधी

कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी आजचा दिवस “करो या मरो” पेक्षा कमी नाही. 2017 मध्ये लॉर्ड्सवर तिच्या 51 धावा आणि तो पराभव अजूनही मनात खोलवर कोरलेला आहे. पण आज तिला कपिल देव (1983) आणि महेंद्रसिंग धोनी (2011) यांच्या शौर्याची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळाली आहे. जर भारताने आज विजेतेपद पटकावले, तर हरमनप्रीतही या सुवर्ण क्लबमध्ये नाव कोरून ठेवेल. 36 वर्षीय हरमनसाठी हा एकदिवसीय विश्वचषक कदाचित शेवटचा असेल. पुढच्या चक्रात ती मैदानावर नसेल, पण आज विजय मिळवला तर ती इतिहासाच्या पानांवर कायम राहील.

सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

  • स्थळ: डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
  • वेळ: नाणेफेक – दुपारी 2:30, सामना – दुपारी 3:00
  • थेट प्रक्षेपण: जिओ हॉटस्टार आणि डीडी स्पोर्ट्स (डीडी फ्री डिश)

भारतीय संघ: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, हरलीन देओल, उमा छेत्री (यष्टीरक्षक).

दक्षिण आफ्रिका संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, सुने लुस, ॲनेरी डर्कसेन, अनेके बॉश, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, अयाबोंगा खाका, नोनकुलुलेको म्लाबा, मसाबता क्लास.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon