टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला अडथळे कोण घालतंय?: अजित पवारांच्या सासुरवाडीतून वरिष्ठांकडे सूचक बाण

Follow Us:

Sharad Pawar-Ajit Pawar-NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रि‍करणाच्या चर्चांमध्ये दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. पुढे काय होणार हे चित्र स्पष्ट नाही. पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामुळे कोणत्या नेत्यांच्या अस्तित्वाला धोका आहे, याविषयी अजितदादांची सासूरवाडी तेरमध्ये मोठा दावा करण्यात आला. काय आहे खासदाराचा दावा?

धाराशिव: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया अजित पवारच पुढे घेऊन जात होते. मात्र काही नेत्यांना आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल असं वाटत असल्यानेच ते डावपेच खेळत असल्याची टीका खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता राष्ट्रवादी विलीनीकरण विरोध करणाऱ्या नेत्यांवर केली. पण त्यांचा रोख कुणाकडे आहे हे लपलेले नाही. सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका होत आहे. त्यात इतर पक्षातील नेत्यांचा पण समावेश आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ चिन्हावरील उमेदवारांचा जयंत पाटील मी प्रचार केला , वरिष्ठ पातळीवर सर्व काही ठरलं होतं. मात्र अजित दादा नसल्याने आता शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत असा दावा खासदार लंके (MP Nilesh Lanke) यांनी केला. अजित पवारांची सासरवाडी असलेल्या तेर इथं निलेश लंके यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेवटची प्रचार सभा काल झाली.

काही नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया अजित पवार यांच्या पुढाकाराने सुरू होती. मात्र अजित पवार नसल्याने आता त्याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. काही नेत्यांना आपलं राजकीय भवितव्य असुरक्षित वाटत असल्यानेच हे डावपेच टाकले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी केला. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उमेदवारांना चॉईसने चिन्ह देण्यात आले. तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत देखील घड्याळ चिन्हावर लढत असलेल्या उमेदवारांचा प्रचार जयंत पाटील मी केला. वरिष्ठ पातळीवर सर्व काही ठरलं होतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून बोलणी झाल्यामुळेच हे घडलं असा दावा निलेश लंके यांनी केला. शिवाय अजित दादा गटाच्या नेत्यांकडून विलीनीकरणाबाबतची भूमिका मांडली जात आहे त्यावर राजकीय अस्तित्व धोक्यात येईल असं वाटल्याने डावपेच टाकले जात असल्याचा आरोपही केला. धाराशिवच्या तेर येथे राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांच्या प्रचारासाठी आले असता लंके बोलत होते. निलेश लंके यांची प्रचाराची शेवटची सभा तेर इथं पार पडली.

आज बारामतीत गर्दी

दिवगंत अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वनपर भेटीसाठी आज शेवटचा दिवस आहे. आज संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्य एकत्र दिसतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निधनानंतर सांत्वनपर भेटीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते, नागरिक पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ, जय पवार आणि पवार कुटुंबातील सगळे सदस्य सांत्वनपर भेटीसाठी आलेला लोकांना भेटत आहेत. आज सांत्वनपर भेटीचा अखेरचा दिवस असल्याने सहयोग सोसायटीमधील सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य