Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Streaming : आयपीएलच्या 18 व्या मोसमात रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. राजस्थान गतउपविजेता हैदराबादविरुद्ध भिडणार आहे.
आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमाला (IPL 2025) 22 मार्चपासून सुरुवात झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हंगामतील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर आता रविवारी 23 मार्च रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. पॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर दुखापतीमुळे संजू समॅसन नेतृ्त्व करणार नाही. त्यामुळे राजस्थानच्या कर्णधारपदाची धुरा युवा रियान पराग याच्याकडे आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना केव्हा?
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना रविवारी 23 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना कुठे?
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याला दुपारी 3 वाजून 30 सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओ हॉटस्टार एपद्वारे सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहायला मिळेल.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघात आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण 20 सामने खेळवण्यात आले आहेत. काही सामन्यांचा अपवाद वगळला तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. हैदराबादने 20 पैकी 11 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानने हैदराबादवर 9 वेळा विजय मिळवला आहे.
सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, सचिन बेबी, हर्षल पटेल, ॲडम झम्पा, मोहम्मद शमी, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कमिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, वियान मुल्डर, अथर्व तायडे, सिमरन सिंह, एशान मलिंगा आणि अनिकेत वर्मा.
राजस्थान रॉयल्स टीम : रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शुभम दुबे, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, युद्धवीर सिंह चरक, महीश तीक्षाना, क्वेना मफाका, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि कुणाल सिंग राठौर.
आणखी वाचा
IPL 2025 CSK vs MI : चेन्नई विरुद्ध मुंबई आमनेसामने, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?