टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शरद पवार, पार्थ पवार यांच्यात काय झाली चर्चा? रोहित पवार यांचा मोठा खुलासा, म्हणाले, आम्ही..

Follow Us:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर पवार कुटुंब एकत्र येताना दिसले. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर पवार कुटुंबातील वाद पुढे आला. आता नुकताच रोहित पवार यांनी यावर मोठे भाष्य केले.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान होत आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उत्तर पुणे जिल्ह्यात आज शोककळा पसरली आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले होते. यादरम्यान त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता पवार कुटुंब एकत्र येताना दिसत आहे. नुकताच आमदार रोहित पवार यांनी पिंपळी गावात मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी माध्यमासोबत संवाद साधताना मोठे भाष्य केले.

रोहित पवार यांनी म्हटले की, दादांचे जे स्वप्न होते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दादांचे जे कार्यकर्ते आहेत ते जास्तीत जास्त निवडून यावेत, ही त्यावेळीची त्यांची इच्छा आणि स्वप्न आज आपल्याला म्हणावे लागेल की, ते त्यांचे अंतिम स्वप्न होतं. आज मी माझ्या परिवारासोबत येऊन मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. मला विश्वास आहे की, दादांचे जे स्वप्न होते की, जिल्हा परिषदेला त्यांचे कार्यकर्ते जास्त निवडून येतील ते स्वप्न मतदार आणि कार्येकर्ते पूर्ण करतील.

अजित पवारांची जी इच्छा होती, परिवार म्हणून सर्वजण एकत्र यायला हवे आणि त्याकरिता दादांकडूनही प्रयत्न केला जात होता. सुप्रिया ताई असतील किंवा पवार साहेब आम्ही सर्वजण काहीसा असाच प्रयत्न करत होतो. पवार म्हणून आम्ही एकत्रित आहोत आणि अजित दादांचे जे स्वप्न आहे पवार कुटुंब एकत्र राहिले पाहिजे तसेच काहीतरी होईल. आज कोणीही न ठरवून सर्वजण एकत्र आले. परिवार पुन्हा एकदा एकत्र येत आहे.

शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओवर बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, आमच्यामध्ये भावनिक चर्चा झाली. काही गोष्टी येत्या काळात आपल्याला कराव्या लागणार आहेत. राजकीय नाही.. सुनील तटकरे यांच्याबद्दल बोलणे टाळताना रोहित पवार दिसले. विलिगीकरणाच्या मुद्द्यावरही बोलताना रोहित पवार दिसले. सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना बघतो. राष्ट्रीय अध्यक्षपदाची खाली झालेली जागा सुनेत्रा काकींनाच मिळावी, ही कुठेतरी इच्छा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य