टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजित पवारांशी काय चर्चा झाली होती? शरद पवार गट एक-एक पुरावा बाहेर काढणार, सगळा प्लॅन सांगणार

Follow Us:

NCP Merger news: अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या.

Ajit Pawar and Sharad pawar Camp NCP: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) गटात गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याविषयी चर्चा सुरु होती, असे सांगितले जाते. पुणे आणि पिंपरी महानगरपालिका निवडणुकीतील युती हे त्याचदृष्टीने टाकलेले पाऊल होते. अजित पवार येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची (NCP Merger) घोषणा करणार होते, असा दावा सातत्याने शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी भाजपसोबत सत्तेत राहणे पसंत केले आहे. मात्र, अजित पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणायच्या होत्या, हे शरद पवार गटाकडून अधोरेखित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या विलीनीकरणाबाबत नेमकं काय झालं याचा इतिवृत्तांत लवकरच मांडला जाणार आहे. 9 फेब्रुवारी नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आणि रोहित पवार भव्य पत्रकार परिषद घेऊन बैठकांतील व्हिडिओ चित्रीकरणासह नेमके काय टप्पे ठरले होते याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. शपथविधीबाबत नेमकं काय घडलं? पक्ष एक झाल्यानंतर काय करायचं ठरलं होतं, याबाबत  या पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत अनेक मोठे राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळाच्या नजरा या पत्रकार परिषदेकडे लागल्या आहेत.

17 जानेवारी 2026 रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली होती. ज्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अजितदादा गटाच्या सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला होता. या बैठकीत केवळ जिल्हा परिषद निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, शरद पवार यांनी 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा होणार असल्याचे म्हटले होते. पण त्यापूर्वीच अजित पवार आम्हाला सोडून गेले, असेही शरद पवार यांनी सांगितले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य