AI Video: शिवजयंती निमित्त पाहूया रायगडाचा वैभवशाली काळ, ४०० वर्षांपूर्वी रायगड कसा दिसायचा? हे तुम्ही या AI व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ इतका सुंदर आहे की, तुम्हाला जणू त्या काळात गेल्याचाच भास होईल.

(फोटो सौजन्य – ai_kunal/Instagram)

कसा दिसत असेल रायगड?
हा व्हिडीओ ai_kunal या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही AI टेक्नोलॉजीच्या मदतीनं तयार करण्यात आलेला रायगड किल्ला पाहू शकता. या किल्यावर लोकांची रेलचेल पाहायला मिळतेय. मोठमोठे वाडे दिसत आहेत. जगदिश्वराच्या मंदिरात पूजा सुरू आहे. मावळे डोळ्यांत तेल घालून तटबंदीचं रक्षण करत आहेत. तलावांमध्ये घोडे पाणी पित आहेत. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा टाईममशिनमध्ये बसून महाराजांच्या काळात गेल्यासारखं वाटेल. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ८७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे.
हा व्हिडीओ सुद्धा पाहा
रायगड हा इतिहासातील भव्यदिव्य असा किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती १२ व्या शतकात चंद्रराव मोरे यांच्या काळात झाली होती, असे म्हटले जाते. त्यावेळी या किल्ल्याचे नाव रायरी होते. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याची दुरुस्ती करून त्याला स्वराज्याची राजधानी बनवली. याच किल्ल्यावर पुढे महाराजांचा राजाभिषेक झाला. हा किल्ला समुद्रसपाटीपासून तब्बल २७०० फूट उंचीवर आहे. यावरून लक्षात येते की महाराजांनी राजधानी म्हणून रायगडाची निवड का केली. आजही हा किल्ला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात.








