अमेरिकेत १७ फेब्रुवारीला होणार विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
अमेरिकेत १७ फेब्रुवारीला होणार विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

सोलापूर, 12 फेब्रुवारी (हिं.स.)।

अमेरिकेतील सीएटल येथील भारतीय तरुण रेडमंड येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये महाराष्ट्राचे दैवत श्री विठ्ठल-रखुमाई, शेगावचे संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोमवार, दि. १७फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून तत्पूर्वी १५ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना आरंभ करण्यात येणार आहे.सीएटल परिसरातील रेडमंड येथे साईबाबा मंदिर आहे.

याठिकाणी मराठी तरुणांनी महाराष्ट्राचे लोकदैवत श्री विठ्ठल-रखुमाई, संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच संकल्प काही काळापूर्वी सोडला होता. त्याची पूर्तता आता होत आहे. यानिमित्त १५ आणि १६ फेब्रुवारीला गोमाता पूजन, होम-हावन, भजन, यज्ञ, पारायण, हरिपाठ पठण तसेच महाप्रसादाचे वाटप हे कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (दि. १७) श्री विठ्ठल-रखुमाई, संत गजानन महाराज मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मुख्य कार्यक्रम होत आहे. यानिमित्त भारतातील १०८ नद्यांचे जल, पवित्र माती आणली आहे. याचा उपयोग अनुक्रमे अभिषेकासाठी आणि मूर्तीचा पाया भरण्यासाठी केला जाणार आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon