Virat Kohli : विराटकडून वनडे क्रिकेटमधील निवृत्तीचे संकेत! झिरोवर आऊट झाल्यानंतर तो फोटो व्हायरल

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Virat Kohli 2nd Consecutive Duck : विराट कोहली याला दुसऱ्या सामन्यातही त्याच्या लौकीकाला साजेसं असं काहीच करता आलं नाही. विराटने सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाल्यानंतर काय केलं? जाणून घ्या.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात घोर निराशा केली. विराट एडलेड ओव्हलमध्ये भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. विराटची एकदिवसीय क्रिकेटमध्ये या मालिकेत झिरोवर आऊट होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. विराटने 4 चेंडूंचा सामना केला. मात्र विराटला खातं उघडता आलं नाही. झिरोवर आऊट झाल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. विराट या निराशासेह ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला. यावेळेस क्रिकेट चाहत्यांनी विराटला स्टँडिंग ओव्हेशन देत सन्मान दिला. विराटनेही चाहत्याचं अभिवादन स्वीकारलं. त्यानंतर विराटने केलेल्या एका इशाऱ्यामुळे तो लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. विराटचा ऑस्ट्रेलिया विरूद्धचा तिसरा आणि अंतिम सामना हा त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील शेवटचा सामना असल्याचं म्हटलं जात आहे.

विराट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट

विराट पर्थमध्ये रविवारी 19 ऑक्टोबरला झाला होता. विराट पर्थमध्ये 8 चेंडूंचा सामना केल्यानंतरही 1 धावही करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे विराट एडलेडमध्ये कमबॅक करेल, असा विश्वास चाहत्यांना होता. तसेच विराटची या मैदानातील कामगिरीही अफलातून राहिली आहे. त्यामुळे विराट त्याच्या आकडेवारीला साजेशी खेळी करत कमबॅक करेल, असं वाटलं होतं. मात्र विराटला काहीच करता आलं नाही. झेव्हीयर बार्टलेट याने विराटला एलबीडब्ल्यू करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

विराटकडून निवृत्तीचे संकेत!

विराट कोहली आऊट झाल्यानंतर मैदानाबाहेर जायला निघाला. विराट बाउंड्री लाईनजवळ येताच स्टेडियममधील चाहत्यांनी उभं राहत त्याने दिलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील योगदानासाठी त्याचे आभार मानले. विराटने ग्लोव्हज दाखवत एका प्रकारे आपला हा या मैदानातील शेवटचा सामना असल्याचंही अप्रत्यक्ष दाखवलं. त्यामुळे विराट तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon