टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vijay Shivtare : मृत्यूशी झुंजणाऱ्या विजय शिवतारेंना नवजीवन, डॉक्टर लेकीकडून किडनीदान, मुंबईत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

Follow Us:

Vijay Shivtare Kidney Transplant : कर्तव्यदक्ष मुलगीच आणि सजग डॉक्टर या नात्याने डॉ. ममता यांनी वडील विजय शिवतारे यांना प्राणघातक संकटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला

पुणे : पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर सोमवारी मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलगी डॉ. ममता शिवतारे यांनी विजय शिवतारे यांना एक किडनी दिली. मुंबईतील खासगी रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

वडिलांना किडनीदान

गेल्या काही वर्षांपासून शिवतारे यांना किडनीविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांना डायलिसिसद्वारे उपचार देण्यात येत होते. सोमवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर विजय शिवतारे आणि ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या पित्याला नवजीवन देण्यासाठी ममता यांनी स्वतःची किडनी दान केली आहे.

जन्मदात्याला नवजन्माचं गिफ्ट

एक कर्तव्यदक्ष मुलगीच नाही, तर डॉक्टर या नात्याने डॉ. ममता यांनी वडिलांना प्राणघातक संकटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. स्वतःची किडनी दान करत जन्मदात्यालाच नवीन जीवन दिलं. ममता या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.

कोण आहेत विजय शिवतारे?

विजय शिवतारे हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. २००९ आणि २०१४ असा सलग दोन वेळा त्यांनी विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विजय शिवतारे आणि अजित पवार हे पारंपरिक विरोधक मानले जात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारेंना सांगून पाडलं होतं. मात्र २०२४ मध्ये राजकीय समीकरण बदलली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. फुटलेली राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची युती झाली. शिवतारे शिंदेंच्या पक्षात सामील झाले.

शिवतारेंनी पुन्हा जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असताना दादा आणि विजय शिवतारे यांचं मन जुळवण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागली होती.

विजय शिवतारे यांनी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ते काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिले होते, मात्र आता शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा जोमाने जनसेवेत उतरतील, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा