सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यात कोळा व कमलापुर येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असल्याची घटना 2 एप्रिल रोजी घडली.अपघातात अमित घुले (वय 30 वर्षे, रा. पाचेगाव खुर्द ता. सांगोला) व व सुरज निषाद (वय 23 वर्षे, रा. मगरघटा ता. बेमेतरा जि. नांदघाट रा. थत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अपघाताची फिर्याद वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पहिल्या अपघातात अमित घुले हा अनुसे मळा सांगोला ते मिरज जाणारे रोडवर कमलापुर ता. सांगोला येथे रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झालेने त्यास उपचारास ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल केले असता तो उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकाँ भोसले हे करीत आहेत.
त्याचप्रमाणे दुसर्या अपघातात सुरज निषाद हा आटपाडी रोड कोळा ता. सांगोला येथे रस्ते अपघातामध्ये जखमी झालेने त्यास उपाचाराकरीता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल केले असता तो उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकाँ भोसले हे करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाण्याचा शब्द पाळला – चेतनसिंह केदार सावंत
संबंधित बातम्या
सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे उदघाटन संपन्न
सांगोला येथे पिकअप-दुचाकीची जोराची धडक; 1 जण ठार
3 ऑगस्ट रोजी जन्माला येणार्या मुलींच्या नावे 15 हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांचा संकल्प
डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल मध्ये स्व.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन
बलवडी येथे महाआरोग्य शिबिर, रक्तदान, डोळे तपासणी संपन्न




