निष्कलंक, चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्वामुळे आबासाहेबांचे नाव आजही स्वाभिमानाने व आदराने घेतले जाते – ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठारे
सांगोला (प्रतिनिधी):-आबासाहेब यांचा ज्यांनी ज्यांनी हात धरला त्यांचे कल्याण झाले असून राजकारणात राहून आबासाहेब परमार्थाचे जीवन जगले आहेत.निष्कलंक जीवन, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे आबासाहेब. आबासाहेब निष्कलंक जीवन जगले त्यामुळे आबासाहेबांचे नाव आजही संपूर्ण राज्यभरात मोठ्या स्वाभीमानाने व आदराने घेतले जात असल्याचे उद्गार कर्जत जामखेड येथील किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठारे यांनी व्यक्त केले.
स्वर्गीय भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोला सुतगिरणी येथील समाधीस्थळावर भजन कीर्तन पुष्वृष्टी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कर्जत जामखेड येथील किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठारे बोलत होते. यावेळी आबासाहेबांच्या पत्नी रतनबाई गणपतराव देशमुख, कन्या शोभाताई पाटील, श्री.चंद्रकांतदादा देशमुख, नातू आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख, सौ.सरोजनी पोपट देशमुख, सौ.सुरेखा चंद्रकांत देशमुख, डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख, डॉ.आस्था अनिकेत देशमुख, सुप्रिया देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबिय उपस्थित होते.
पुढे बोलताना ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठारे म्हणाले, सर्वांना आदर्श असणारे व्यक्तीमत्व म्हणजे आबासाहेब. आबासाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन तालुक्यात क्रांती घडविली.आबासाहेबांमुळे तालुक्यात आजही शांतता अबाधित आहे. आबासाहेबांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते.आबासाहेब यांनी तालुक्यालाच आपले कुटुंब समजले होते.त्यामुळे आजही संपूर्ण तालुका आबासाहेबांना आपले आदर्श मानत असल्याचे त्यांनी सांगत आबासाहेबांनी दिलेले विचार सर्वांनी पुढे घेऊन जावेत असे सांगितले.
संबंधित बातम्या





यावेळी ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, मा.आमदार प्रशांत परिचारक, मा.आमदार रामहरी रुपनवर, अजिंक्यराणा राजन पाटील, जीवन उत्तमराव जानकर, ब्रह्मानंद पडळकर, प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सौ.राणीताई माने, चेतनसिंह केदार-सावंत, श्रीकांतदादा देशमुख, सागर पाटील, यशराजे दिपक आबा साळुंखे पाटील, भरत शेळके, चेतन नरोटे, प्रांताधिकारी भैरवनाथ माळी, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार संतोष कणसे, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, डॉ.प्रभाकर माळी, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, माजी चिटणीस विठ्ठलराव शिंदे, चिटणीस दादाशेठ बाबर, अॅड.सचिन देशमुख, इंजि.रमेश जाधव, अरुण पाटील, समाधान पाटील, बाळासाहेब काटकर, अमोल खरात, मायाप्पा यमगर, प्रमोद साळुंखे-पाटील, माऊली हळणवर, सोमनाथ आवताडे, नागेश फाटे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सांगोला तालुक्यासह राज्य, जिल्ह्यातील नागरिक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, विधीज्ञ बांधव, शिक्षक, अधिकारी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, महिला भगिनी, तालुक्यातील सर्व विविध संस्थाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना अभिवादन केले.