भंडारा, 18 फेब्रुवारी, (हिं.स.)। भंडारा जिल्ह्यात वाघांचा मृत्यू थांबता थांबत नाही आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात असलेल्या सितासावंगी येथील राखीव वनात एक वाघ मृत अवस्थेत असल्याची माहिती गुराख्यानी वन विभागाला दिली. वाघ मृत असल्याची माहिती होताच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
हा वाघ 3 ते 4 वर्षाचा असल्याचं अंदाज वर्तविण्यात आला. घटनास्थळी पशू वैद्यकीय अधिकारी देखील दाखल झाले. वाघाच्या तोंडावर, पायावर, मानेवर घाव असल्याने दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र जानेवारी महिन्यापासून एकट्या तुमसर तालुक्यात तीन वाघांचा मृत्यू झाला असल्याने वन विभागाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.
इथे हि वाचा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा