टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

‘माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा गर्भित इशारा!

Follow Us:

Sangli Politics: माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांना एकदा जाऊन विचार  सुहास बाबर कोण आहे ते, मुख्यमंत्री याचे उत्तर देतील असे म्हणत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी विरोधी गटातील भाजपच्या नेते पदाधिकाऱ्यांना आव्हान दिले. खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी गावात प्रचार सभेत आमदार सुहास बाबर बोलत होते.

मी दिसतो शांत पण कार्यक्रम करायला लागलो तर

खानापूर तालुक्यात जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार टशन आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याने भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये एकमेकावर जोरदार टीका होत आहे. भाजपच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला सुहास बाबर यांनी प्रत्युत्तर दिले.आज सुहास बाबर खानापूर आटपाडीमधील काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजप पण चालवतो, मी दिसतो शांत पण कार्यक्रम करायला लागलो तर विट्यात मी काय केलंय हे माहित आहे असंही सुहास बाबर म्हणाले.

धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यात प्रचार सभा घेतली. तालुक्याला सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाळव्यात जाहीर सभेत पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर शिंदे यांनी भर दिला. धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, असा संदेश देत त्यांनी मतदारांना धनुष्यबाणासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य