Team India :भारतीय टीम दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन मोठे बदल होऊ शकतात. कुलदीप यादवला संघात स्थान दिलं जाऊ शकतं.
पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे मॅचमध्ये अपयश आल्यानंतर शुभमन गिलपुढं दुसरी मॅच जिंकण्याचं आव्हान आहे. पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध 7 विकेटनं विजय मिळवला. गुरुवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया अॅडिलेड ओवलमध्ये दुसऱ्या सामना होणार आहे. दुसऱ्या सामन्यात विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरेल. पावसामुळं पहिल्या सामना 26 ओव्हरचा झाला होता. भारतानं पहिल्या वनडे 9 बाद 136 धावा केल्या होत्या. मिशेल मार्शच्या नेतृत्त्वातील टीमनं 7 विकेटनं विजय मिळवला. भारतासमोर दुसरा सामना जिंकण्याचं आव्हान आहे. या करो वा मरो या सामन्यात संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे.
शुभमन गिलच्या टीमला दुसऱ्या वनडेत विजय मिळवणं आवश्यक आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्या वनडेत चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. या करो या मरो या मॅचमध्ये शुभमन गिलला दोन मोठे बदल करावे लागतील. गौतम गंभीर याचा लाडका खेळाडू हर्षित राणाला संघातून बाहेर ठेवलं जाऊ शकतं. कुलदीप यादला संघात स्थान दिलं जाऊ शकतं.
विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्या वनडेत अनुक्रमे 0 आणि 8 धावा केल्या. अॅडिलेडमध्ये रोहित शर्मा सलामीवर म्हणून फलंदाजीला येईल.तर, विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येईल. टीम इंडिया गोलंदाजीमध्ये बदल करेल, अशी शक्यता आहे.
पहिल्या वनडेत भारतीय संघ व्यवस्थापनानं कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवलं होतं. दुसऱ्या वनडेत कुलदीप यादवला संधी मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय नितीश कुमार रेड्डीच्या जागी देखील कुलदीप यादवला संधी मिळू शकते.
संबंधित बातम्या





हर्षित राणाच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते. प्रसिद्ध कृष्णानं इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. प्रसिद्ध कृष्णानं भारतासाठी 17 वनडे खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 29 विकेट घेतल्या.यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांना संघात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
भारताचा संघ : शुभमन गिल (कॅप्टन ), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकॅप्टन), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल