टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sunetra Pawar: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, काय झाली चर्चा, नवीन राजकीय धक्का?

Sunetra Pawar Phone Call to Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोड घडत आहे. राज्यात बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने उमेदवार देण्याची घोषणा करत बिनविरोध निवडणुकीला धक्का दिला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या धामधुमीत उद्धव ठाकरेंना फोन केला आहे.

Sunetra Pawar: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, काय झाली चर्चा, नवीन राजकीय धक्का?

ShareSunetra Pawar Phone Call to Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोड घडत आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आता टप्प्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया आलेली नाही. महाविकास आघाडी काँग्रेससोबत असणार की नाही हे समोर आलेले नाही. त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे  यांना फोन केला आहे.

दिवंगत अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार यांनी अगोदर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता आमदारकीसाठी त्या बारामतीची पोटनिवडणूक लढवतील. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष बारामती पोटनिवडणुकीत उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे. तर त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठीही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे काँग्रेससोबत याविषयावर चर्चा करतील का याची उत्सुकता ताणली गेली आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी अजून काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

बारामती आणि राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी दिल्लीहून हिरवा कंदिल मिळाल्याची माहिती आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी 6 इच्छुकांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. तर राहुरी मतदारसंघासाठी 4 उमेदवारांनी पक्षाकडे तिकीट मागितले आहे. या सर्वांच्या ऑनलाईन मुलाखती झाल्यात. आता काँग्रेस मित्रपक्ष उद्धव सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा करेल आणि निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादी जर निवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस ही निवडणूक लढण्यास तयार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. काँग्रेसला राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडीसह इतरांनी या पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Devendra Fadnavis : काँग्रेसने ठरवलं बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवायची, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की..

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, मंत्र्यांनेही घेतली भेट; मोठा भूकंप होणार?

Satara Jilha Parishad: ‘गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात’ सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला

Nashik Accident News : घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू

NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?

Gang leader killed after seeing Dhurandhar

मोठी बातमी : धुरंधर पाहून आलेल्या गँगच्या म्होरक्याला संपवलं, मग भावाने रुग्णालयात जाऊन बदला घेतला, नांदेडमध्ये डेंजर गँगवॉर