एकाच दिवशी आई-वडील, मुलगी आणि नातीचा काळ आला.. आणि भीषण आगीत होरपळून संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला, नेमकं घडलं तरी काय…, भयानक घटना आणि अख्ख्या गावाच्या डोळ्यात पाणी
कधी काय होईल सांगता येत नाही… असं आपण कायम म्हणत असतो… पण जेव्हा धक्कादायक घटना समोर येते तेव्हा मन विचलित होतं… असं देखील म्हणतात की, काळ आणि वेळ एकत्र येते तेव्हा मृत्यू येतो.. अशी धक्कादायक घटना एका कुटुंबासोबत घडली आहे. एकाच दिवशी आई-वडील, मुलगी आणि नातीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे… भीषण आगीत होरपळून संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला आहे.. ही घटना सांगली येथे घडली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण..
सांगली जिल्ह्यामधील विटा शहरात इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. परिसरातील तीन मजली इमारतीला आग लागली होती. या भीषण आगीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू तर 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडील, मुलगी आणि नात अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे. विष्णु जोशी वय 47, सुनंदा विष्णु जोशी वय 42, प्रियांका योगेश इंगळे वय 25 आणि सुष्टी इंगळे वय 2 अशी मृतांची नावे.
स्टील फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत इमारत जळून खाक झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. विटा शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी इमारतला भीषण आग लागली आहे… शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर अख्ख्या गावाच्या डोळ्यात पाणी आलं…
संबंधित बातम्या
यांसरख्या घडणाऱ्या घटनांमुळे मन विचलित होतं. सांगली येथे झालेल्या घटनेत कुटुंबाचा अतं झाला. तर रविवारी नंदुरबारच्या देवगोई घाटात झालेल्या अपघातात 2 विद्यार्थ्यांनचा मृत्यू झाला असून, दोन जखमी असल्याची माहिती मिळत आहे… नंदुरबारच्या देवगोई घाटात झालेल्या अपघातात चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे….
आश्रम शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला आहे. एका मिनी बसमध्ये 56 विद्यार्थी एक शिक्षक, एक शिपाई आणि एक चालक असे मिळून 59 लोक बस मध्ये होते. अपघात झाल्यानंतर रात्री उशिरा चालक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे… या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे….



