Uddhav Thackeray-Sharad Pawar : शिवसेना नेमकी कुणाची? राष्ट्रवादी नेमकी कुणाची? यावर राजकीय गोळाबेरीज सुरू आहे. हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहचलेला आहे. सर्वोच्च निकालाची अद्याप प्रतिक्षा आहे. पण भाजपच्या या बड्या नेत्याच्या जे मनात आहे, ते आपसूकच ओठांवर आल्याची चर्चा होत आहे.
Shivsena And NCP : राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील चाणक्य असल्याने त्यांनी ही चुणूक दाखवल्याचा दावा झाला. शिवसेना नेमकी कुणाची? राष्ट्रवादी नेमकी कुणाची? यावर राजकीय गोळाबेरीज सुरू आहे. हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहचलेला आहे. सर्वोच्च निकालाची अद्याप प्रतिक्षा आहे. पण भाजपच्या या बड्या नेत्याच्या जे मनात आहे, ते आपसूकच ओठांवर आल्याची चर्चा होत आहे.

शिवसेना ठाकरेंची तर राष्ट्रवादी शरद पवारांची
तर भाजपने कोल्हापुरात काँग्रेसला हाबाडा दिला. बडे नेते गळाला लागले. याविषयी एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील राजकारणाचा, पक्ष आणि नेत्यांचा धांडोळा घेतला. बोलण्याच्या ओघात त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी नेमकी कुणाची आहे, यावर कोणतेही आढेवेढे न घेता थेट मत मांडलं आणि राजकारणातील कोंडी फोडली.
कोल्हापूर जिल्ह्यात आठ ते दहा घराणे अशी आहेत त्यांना घेतल्याशिवाय त्या त्या भागातील राजकारण होत नाही. विनायक उर्फ अप्पी पाटील यांचा देखील चंदगड मतदारसंघात प्रभाव आहे. कोणत्याही निवडणुकीत चंदगड मधील अप्पी पाटील गट कोणासोबत आहे यावर बरच काही अवलंबून असतं. अप्पी पाटलांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत आहे.
स्वतःच्या आणि मुलाच्याही भविष्याचा विचार त्यांनी केला आहे. एक दोन नाहीतर पुढच्या पन्नास ते शंभर वर्षाचा विचार त्यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टी हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे अमेरिकेच्या लोकसंख्येच्या जवळपास भारतीय जनता पार्टीची सभासद नोंदणी झाली आहे
शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आहे. मनसे राज ठाकरे यांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा, काँग्रेस इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा पक्ष आहे. पण भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. 2014 नंतर पक्षात अनेक पक्ष प्रवेश झाले. मात्र पक्षाने मूळ विचारधारा कधीही सोडलेली नाही. जिल्हाध्यक्षांना विनंती आहे आपली पाटील हे वेगळ्या पक्षाच्या संस्कृतीमधून आले आहेत त्यांना सांभाळून घ्या, असे आवाहन चंद्रकांतदादांनी केले.
भाजपात रोज इन्कमिंग
संबंधित बातम्या
भाजप पक्षात दररोज इन्कमिंग सुरू झालं आहे. 2014 नंतर अडीच वर्षे सत्ता नसताना देखील कुणी पक्ष सोडून गेले नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवलं. राज्यात आम्ही एक नंबरला आहोत, एक नंबर आणि दोन नंबरमध्ये मोठा फरक आहे दर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश होत राहणार असा दावा त्यांनी केला. मी काही शरद लाड यांची उमेदवारी घोषित केली नाही. मी सांगलीत भाषणात म्हणालो की शरद लाड हे पदवीधरचे उमेदवार असू शकतात. आमच्याकडे उमेदवारी घोषित करण्यासाठी समिती असते. मला उमेदवार घोषित करण्याचा अधिकार नाही. अरुण लाड यांनी हसन मुश्रीफ यांना काय शब्द दिला याच्याशी माझ्या पक्षाचा संबंध नाही असे चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले.
33 पेक्षा जास्त जागेवर ठाम
सांगली आणि कोल्हापूरमध्ये आमची जी फिगर आहे ते उमेदवार घेणार, त्याच्या खाली आम्ही येणार नाही. जे उमेदवार विजयी होतील, त्यांचा तसा सर्व्हे आला तर उमेदवार निवडण्याचे समिती ठरवते. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आम्ही 33 जागेच्या खाली येणार नाही. 33 पेक्षा जास्त जागा आम्ही घेणार, जागेवर अदलाबदली होऊ शकते, असा दावा चंद्रकांतदादांनी केला.
महायुतीत संघर्षाची चिन्हं?
पुणे पदवीधर मतदार संघातल्या आगामी निवडणुकीसाठी शरद लाड यांच्या उमेदवाराची अनौपचारिक घोषणा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. पलूस या ठिकाणी पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमांमध्ये चंद्रकांत पाटलांनी पदवीधरचे भावी उमेदवार शरद लाड असा उल्लेख करत ताकाला जाऊन, भांड लपवत नाही,अशी भूमिका स्पष्ट केली आहे.मात्र चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे महायुतीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा कुस्ती लागण्याची शक्यता आहे.
कारण कोल्हापूर मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे युवानेते भैय्या माने यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत,तसे सूतोवाच देखील मुश्रीफांकडून करण्यात आले होते, अशा परिस्थितीमध्ये चंद्रकांत पाटलांनी नुकतेच भाजपात प्रवेश केलेले पदवीधरचे विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाडे यांचे पुत्र शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा पदवीधर मतदारसंघावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.




