शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार -आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख 

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला- विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून लवकरच शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत सदरची योजना चालू न झाल्यास ८२ गावे व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई उद्भवणार असून सध्या सांगोला तालुक्यात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे असून सदरची योजना तातडीने कार्यान्वित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना पटवून दिली. सदरच्या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना टंचाई निधी मधून ५.४१ कोटी इतकी थकबाकी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. या आदेशाची दखल घेत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

सदरचा निधी तातडीने उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon