सांगोला: शक्तीपीठ महामार्ग मुळ आरेखणामध्ये कोणत्याही स्वरुपाचा बदल न करता जीएमआर पुर्ण करून सदर रस्ता करण्याबाबत शेतकर्यांची पुर्णपणे संमती आहे. अगर बदल केल्यास संबंधीत भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालयात जावून आत्मदहन करण्याचा इशारा सांगोला तालुक्यातील बाधित शेतकर्यांकडून सरकारला देण्यात आला आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात बाधित शेतकर्यांकडून काल सांगोला येथे पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रविण चौगुले (चोपडी), नवनाथ पडवळे (कमलापूर), दादा जाधव (सांगोला), संतोष बेहेरे (चिंचोली), नानासाो पुजारी (चिंचोली), बिरा अण्णा बेहेरे (चिंचोली), तुषार चव्हाण चिंचोली), दादासो पिंगळे (चिंचोली), अजित नायकुडे (सांगोला), तेजस कोकरे (मंगेवाडी), चंदू बंडगर (वझरे), अनिल बेहेरे (चिंचोली), अनिल चौगुले (चोपडी), दत्ता चोरमुले (मंगेवाडी), विनायक कुलकर्णी (मांजरी) यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.
नागपूर-पत्रादेवी-गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील बारा जिल्हयातून जात असुन त्याबाबतचे आरेखण यापुर्वी महाराष्ट्र शासनाने राजपत्र जाहिर करुन वृत्तपत्रामध्ये प्रसिध्दीकरण केले होते. त्याअन्वये सदर आरेखणाचे काम मोणार्क या कंपनीने केले असुन संबंधीत रस्त्याच्या खुणा शेतकर्यांच्या जागेवर जावून प्रत्यक्ष खांब उभा करून केलेले आहेत. त्यानुसार सदर बाधीत शेतकर्यास उप अधिक्षक भूमि अभिलेख यांचे मार्फत नोटीसद्वारे कळवून 75 ते 80 टक्के मोजणीचे काम पुर्ण केले आहे. सोलापूर जिल्हयातील ही पंढरपूर व मोहोळ या तालुक्याच्या मोजण्या पुर्ण होवून बार्शी व सांगोला तालुका पुर्णत्वाच्या दिशेने मोजणीचे काम होत आलेले आहे.
परंतू मा. मुख्यमंत्री महोदय यांनी धाराशिव पर्यंतचे काम मुळ आरेखणानुसार होणार असुन पुढील काम म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्हा या मध्ये थोड्याप्रमाणात रस्ता करण्यास विरोध असल्यामुळे त्याचे आरेखणात बदल करणार असल्याचे सांगितले. परंतू सोलापूर जिल्हयातील मोजणीचे काम 75 ते 80 टक्के पुर्ण झाले असल्यामुळे उर्वरित काम प्रशासनाने लवकरात लवकर पुर्ण करून अतंर्गत मुल्यांकन करणेबाबत शेतकर्यांनी इच्छा दर्शविली आहे. तसेच संबंधीत भुसंपादन अधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष देवून उर्वरित मोजणीची कामे पुर्ण करण्यात कुठेही हरकत अडथळा असणार नसल्याचे रस्ता बाधीत शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे सदर मोणार्क कंपनी, उप अधिक्षक मोजणी अधिकारी व भुसंपादन अधिकारी यांनी चुकीच्या अफवांना बळी न पड़ता जुलै 2025 पासुन होत असलेली मोजणीची कामे लवकरात लवकर पुर्ण करुन घ्यावी. अशी शेतकर्यांची मागणी आहे.
संबंधित बातम्या
*टायटन सिझन सेल*


टायटन घड्याळांवर 30% पर्यंत सूट*
स्किन परफ्यूम/वॉलक्लॉकवर 20% पर्यंत सूट
चष्म्यांवर Buy1 Get1 ऑफर*
बाटा प्रॉडक्टवर *GST* महाबचत सूट
क्रेडीट-कार्ड/बजाज फायनान्स EMI*टायटन वर्ल्ड | टायटन आय +| बाटा*एस टी स्टॅन्ड जवळ,
भोपळे रोड,सांगोलाटायटन संपर्क – 7507 995 995
बाटा संपर्क – 7210 995 995




