BCCI Naman Awards News : रविवारी नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात जेव्हा टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाला मंचावर सन्मानासाठी बोलावण्यात आलं.
Sanju Samson hug KL Rahul : बीसीसीआयच्या वार्षिक नमन पुरस्कार (BCCI Naman Awards) सोहळ्यात रविवारी भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्यात मागील वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आणि चॅम्पियन भारतीय संघांचा गौरव करण्यात आला. मात्र, या सर्व सोहळ्यात संजू सॅमसनच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नेमकं काय घडलं?
रविवारी नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात जेव्हा टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाला मंचावर सन्मानासाठी बोलावण्यात आलं. तेव्हा सर्व खेळाडू एकापाठोपाठ एक मंचाच्या दिशेने जाऊ लागले. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनदेखील इतर खेळाडूंसोबत पुढे जात होता. त्याच वेळी समोरच्या रांगेत बसलेला केएल राहुल उभा राहिला आणि त्याने वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंसाठी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करायला सुरुवात केली.
संजू माघारी फिरला अन्…
संजू सॅमसन मंचाच्या दिशेने काही पावलं पुढे गेला होता, पण केएल राहुल टाळ्या वाजवत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. राहुलचा आदर आणि त्याचे कौतुक पाहून संजू मागे फिरला. तो मंचाकडे न जाता थेट राहुलच्या दिशेने वळाला. संजूने तिथे जाऊन केएल राहुलला घट्ट मिठी मारली आणि त्याचे आभार मानले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी संजू सॅमसनच्या स्वभावाचे भरभरून कौतुक केले.
बीसीसीआय पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी -(Check the full list of winners at the BCCI Naman Awards 2026)
जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी
- रॉजर बिन्नी
- राहुल द्रविड
- मिताली राज
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (2024-25)
- महिला – स्मृती मानधना
- पुरुष (पॉली उम्रीगर पुरस्कार) – शुभमन गिल
महिला वनडे – सर्वाधिक विकेट्स / धावा
- महिला वनडेतील सर्वाधिक विकेट्स – दीप्ती शर्मा
- महिला वनडेतील सर्वाधिक धावा – स्मृती मानधना
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण (2024-25)
- महिला – एन. श्री चरणी
- पुरुष – हर्षित राणा
जगमोहन डालमिया ट्रॉफी
- सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (ज्युनियर डोमेस्टिक) – इरा जाधव (मुंबई)
- सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (सीनियर डोमेस्टिक, वनडे) – शेफाली वर्मा(हरियाणा)
- सर्वाधिक विकेट्स, विजय मर्चंट ट्रॉफी अंडर-16 (एलीट) – यशबर्धन सिंह चौहान (मध्य प्रदेश)
- सर्वाधिक विकेट्स, विजय मर्चंट ट्रॉफी अंडर-16 (प्लेट) – किशन सरकार (त्रिपुरा)
- सर्वाधिक धावा, विजय मर्चंट ट्रॉफी अंडर-16 (एलीट) – शांतनू सिंह (उत्तर प्रदेश)
- सर्वाधिक धावा, विजय मर्चंट ट्रॉफी अंडर-16 (प्लेट) – प्रीतम राज (बिहार)
एम.ए. चिदंबरम ट्रॉफी
- कूच बिहार ट्रॉफी अंडर-19 (एलीट) – सर्वाधिक विकेट्स: हेमचुदेशन जे (तामिळनाडू)
- कूच बिहार ट्रॉफी अंडर-19 (प्लेट) – सर्वाधिक विकेट्स: अर्काजित रॉय (त्रिपुरा)
- कूच बिहार ट्रॉफी अंडर-19 (एलीट) – सर्वाधिक धावा: नित्या जे पंड्या (बडोदा)
- कूच बिहार ट्रॉफी अंडर-19 (प्लेट) – सर्वाधिक धावा: राघवन राममूर्ती (पाँडिचेरी)
- कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी अंडर-23 (एलीट) – सर्वाधिक विकेट्स: विक्की ओस्तवाल (महाराष्ट्र)
- कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी अंडर-23 (प्लेट) – सर्वाधिक विकेट्स: दीपज्योती सैकिया (आसाम)
- कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी अंडर-23 (एलीट) – सर्वाधिक धावा: मॅकनील एच. एन. (कर्नाटक)
- कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी अंडर-23 (प्लेट) – सर्वाधिक धावा: आर. जशवंत श्रीराम (पाँडिचेरी)
माधवराव सिंधिया पुरस्कार
- रणजी ट्रॉफी (एलीट) – सर्वाधिक विकेट्स: हर्ष दुबे (विदर्भ)
- रणजी ट्रॉफी (प्लेट) – सर्वाधिक विकेट्स: सुचित जे (नागालँड)
- रणजी ट्रॉफी (एलीट) – सर्वाधिक धावा: वाय. व्ही. राठोड (विदर्भ)
- रणजी ट्रॉफी (प्लेट) – सर्वाधिक धावा: स्नेहल कौथंकर (गोवा)
लाला अमरनाथ पुरस्कार
- सर्वोत्तम ऑलराउंडर (डोमेस्टिक लिमिटेड ओव्हर्स) – आयुष म्हात्रे (मुंबई)
- सर्वोत्तम ऑलराउंडर (रणजी ट्रॉफी) – हर्ष दुबे (विदर्भ)
बीसीसीआय डोमेस्टिक स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी – मुंबई क्रिकेट असोसिएशन
2023-24 मधील सर्वोत्तम डोमेस्टिक अंपायर – उल्हास गांधे (विदर्भ क्रिकेट असोसिएशन)











