सांगोला (प्रतिनिधी):- मंत्री कोठ्यातुन मुलांना नोकरी लावतो त्याकरीता तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणुन नोकरीची खोटी ऑर्डर व बनावट ओळखपत्र दाखवुन फसवणुक केली असल्याची घटना उघडकीस आली असुन विजय म्हस्के रा.नातेपुते ता.माळशिरस यांचेविरुध्द सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची फिर्याद बिरा बर्वे (वय 40, धंदा शेती रा.जवळा ता.सांगोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.
याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी बिरा बर्वे हे सन 2022 पासुन मुलांना नोकरी लावण्याकरीता प्रयत्न करत होते. त्यातच विजय म्हस्के हा नातेवाईक असल्याने फिर्यादी यांची त्यांचेशी ओळख होती. त्यावेळी विजय म्हस्के यांनी सांगीतले की, मी दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र राज्य येथे आयुक्त महाराष्ट्र राज्य या पदावर नोकरीला आहेे. आमचे मंत्री कोठयातुन तुमचे मुलांना नोकरी लावतो त्याकरीता तुम्हाला पैसे दयावे लागतील असे म्हणाल्याने विजय म्हस्के हा आमचा जवळचा नातेवाईक असल्याने त्याचेवर विश्वास ठेवला. त्यावेळी त्याने मला सांगीतले की, तुमचे दोन्ही मुलांना नोकरी लावतो त्याकरीता तुम्हाला मला एकुण 24,00,000/- रू. भरावे लागतील असे सांगीतले त्यावेळी त्यांचेवर विश्वास ठेवुन फिर्यादी यांनी रूपये 19 लाख 50 हजार रू. हे दोन्ही मुलांना नोकरी लावण्याकरीता दिलेले होते.
दरम्यानचे काळात मला त्याचे ओळखपत्राची छायांकीत प्रत दिली होती तसेच दोन्ही मुलांचे फॉर्म भरून घेतलेले होते. तसेच दि.18/07/2023 रोजी महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, मंत्री कोठा निर्वाहय मंत्रालय मुंबई 32 याचे कडील फिर्यादी यांचा मुलगा शाम बर्वे तसेच दि.12/07/2023 रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मंत्री कोठा निर्वाहय मंत्रालय मुंबई यांचेकडील मुलगा सुरज बर्वे याचे नावाचे अपॉईटमेन्ट लेटर ही दाखविले. त्यानंतर सदर पत्र दाखविल्यापासुन आज पावेतो नोकरीवर कधी रुजु करून घेणार म्हणून फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून विचारणा केली परंतु तो टाळाटाळ करू लागला व फोन उचलत नव्हता त्यामुळे आम्ही त्याचे घरी नातेपुते येथे जावुन ही त्याची भेट घेतली असता त्याने आम्हाला तुमचे मुलाला लवकरच रूजू करून घेतो तुम्ही काळजी करू नका असे म्हणाल्याने आम्ही त्याचेवर विश्वास ठेवला होता परंतु त्यानंतर त्याने आमचे फोन उचलने बंद केले त्यानंतर मी त्याला माझे दिलेले पैसे हे परत दे असे म्हणालो तेव्हा त्याने दिलेले पैश्यापैकी 4,50,000 रू. हे सन 2024 व 2025 मध्ये परत देवुन राहिलेली रक्कम 15 लाख रुपयांची आमची फसवणुक केली आहे. म्हणुन माझी त्याचे विरूध्द तक्रार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा
MS Dhoni Pention amout : एमएस धोनीला किती रुपये पेन्शन मिळते?
IPL 2025 : 18 व्या मोसमातील सर्वात महागडा कर्णधार कोण? कमी रक्कम या कॅप्टनला