टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल

Follow Us:

Khanapur ZP Election Result : खानापूर तालुक्यात भाजपला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची एकही जागा जिंकला आली नाही. या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने एकतर्फी बाजी मारल्याचं दिसून आलं.

सांगली : ‘मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसला आहे’ अशा शब्दात भाजपला आव्हान देणारे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर (Suhas Babar) यांनी त्यांचा गड राखला आहे. सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजपचा सुपडासाफ केल्याचं दिसून आलं. खानापुरातल्या जिल्हा परिषदेच्या चारही जागा आणि पंचायत समितीच्या आठही जागा शिवसेनेने जिंकल्या असून भाजपला भोपळाही फोडता आला नाही.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या सुहास बाबरांनी त्यांचा करिश्मा कायम ठेवला. जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 ही जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.

Khanapur ZP Election Result : शिवसेनेचा जल्लोष

नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी, शिवसेनेच्या उमेदवार डॉ. शीतल बाबर या विजयी झाल्या. खानापूर तालुक्यात शिवसेनेला भरघोस यश मिळाल्यानंतर आमदार सुहास बाबरांनी शड्डू ठोकला. त्याचसोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला.

निवडणुकीच्या प्रचारावेळी, आमदार सुहास बाबर आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं. त्यावेळी सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत भाजपच्या नेत्यांना इशारा दिला होता. खानापुरात दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस आपणच चालवतो असं सांगत सुहास बाबर यांनी भाजपच्या नेत्यांना दमही दिला होता. आता निवडणुकीच्या निकालामध्येही सुहास बाबर हेच वरचढ असल्याचं दिसून आलं.

Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद 61 पैकी 53 जागांचे निकाल

भाजपा – 17

राष्ट्रवादी अजित पवार – 05

शिंदेसेना – 06

काँग्रेस – 11

राष्ट्रवादी शरद पवार – 17

शिवसेना ठाकरे पक्ष – 01

रयत क्रांती संघटना – 01

जनसुराज्य शक्ती पक्ष – 01

Sangli Panchayat Samiti Election Result : सांगली जिल्ह्यातील पंचायत समिती निकाल 

मिरज पंचायत समिती – 22 गण

भाजपा – 10

राष्ट्रवादी अजित पवार – 03

शिवसेना शिंदे – 02

काँग्रेस – 03

राष्ट्रवादी शरद पवार – 04

शिवसेना ठाकरे गट – 00

वाळवा पंचायत समिती – 22 गण

भाजपा – 04

राष्ट्रवादी अजित पवार – 00

शिवसेना शिंदे – 04

काँग्रेस – 00

राष्ट्रवादी शरद पवार – 14

शिवसेना ठाकरे गट – 00

जत पंचायत समिती – 18 गण

भाजपा – 12

राष्ट्रवादी अजित पवार – 02

शिवसेना शिंदे – 00

काँग्रेस – 04

राष्ट्रवादी शरद पवार – 00

शिवसेना ठाकरे गट – 00

शिराळा पंचायत समिती – 08 गण

भाजपा – 02

राष्ट्रवादी अजित पवार – 03

शिवसेना शिंदे – 00

काँग्रेस – 00

राष्ट्रवादी शरद पवार – 02

शिवसेना ठाकरे गट – 00

अपक्ष – 01 ( राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत)

कडेगाव पंचायत समिती – 08 गण

भाजपा – 01

राष्ट्रवादी अजित पवार – 00

शिवसेना शिंदे – 00

काँग्रेस – 07

राष्ट्रवादी शरद पवार – 00

शिवसेना ठाकरे गट – 00

तासगाव पंचायत समिती – 06 गण

भाजपा – 00

राष्ट्रवादी अजित पवार – 04

शिवसेना शिंदे – 00

काँग्रेस – 00

राष्ट्रवादी शरद पवार – 02

शिवसेना ठाकरे गट – 00

खानापूर पंचायत समिती – 08 गण

भाजपा – 00

राष्ट्रवादी अजित पवार – 00

शिवसेना शिंदे – 08

काँग्रेस – 00

राष्ट्रवादी शरद पवार – 00

शिवसेना ठाकरे गट – 00

ही बातमी वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य